महाराष्ट्रात कोरोनाचा कहर, नागपूरमध्ये एक आठवड्याचा कडक लॉकडाउन

80

नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर शहरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. १५ मार्चपासून २१ मार्चपर्यंत हा लॉकडाउन असेल. या कालावधीत फक्त गरजेच्या वस्तू मिळतील. फळे, भाजीपाला, दूध उपलब्ध करण्यासह आरोग्यसेवा सुरू राहिल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात राज्यात जर रुग्ण वाढले तर इतर भागातही लॉकडाउन लागू करण्याबाबत सूतोवाच केले आहे.
नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांत लॉकडाउन करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांच्या जनता कर्फ्यु लावल्यानंतर येथील निर्णय घेण्यात आला. जळगावमध्ये आज रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे एका दिवसात १३६०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशभरात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या एकूण ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात आताही कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दिसून आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. स्थानिक अधिकारी किती कडक लॉकडाउन करायचा याबाबत निर्णय घेऊ शकतात. नाइट कर्फ्यू अथवा मर्यादीत लॉकडाउनचा पर्यायही अधिकाऱ्यांनीच ठरवायचा आहे.
राज्यातील आरोग्य विभागाने कोरोनाविरोधात लढण्यासाठी सात मुद्यांचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. यामध्ये संक्रमित रुग्णाच्या जवळच्यांचे टेस्टिंग, काँटॅक्ट ट्रेसिंग, हॉटस्पॉटमध्ये टेस्टिंगचा समावेश आहे. या प्लॅनवर काम करण्यास सर्व जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here