लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढला पंतप्रधान मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. संपूर्ण देशात हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली होती. २१ दिवसांसाठी असणाऱ्या या लॉकडाऊनची मुदत आज (मंगळवार) संपली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा देशाला संबोधित करताना ही घोषणा केली.

ते म्हणाले की, ज्यावेळी भारतात एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता, त्यावेळीच आवश्यक उपाययोजना सुरु केल्या होत्या. लॉकडाऊनचा निर्णय वेळीच घेतला नसता तर भारताला इतर प्रगत देशांप्रमाणे भयंकर अवस्थेला तोंड द्यावे लागले असते. आता ज्याप्रमाणे खबरदारी घेत आहोत, तीच पुढील काळात घ्यायची आहे. भारतात अनेक राज्यात यापूर्वीच लॉक डाउन वाढवण्याचे जाहीर करण्यात आले होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here