हा कारखाना मराठवाड्यात ऊसाला सर्वात जास्त दर देणार

माजलगाव : बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या गाळप हंगामाचा बॉयलर प्रदीपन सोहळा रविवारी करण्यात आला. या हंगामासाठी शेतकर्‍यांना मराठवाड्यात सर्वात जास्त दर दिला जाईल व साडेतीन लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करु, अशी ग्वाही अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली. येथील लोकनेते सोळंके सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष आमदार प्रकाश सोळंके यांनी सलग 28 गळीत हंगाम यशस्वी केले आहेत.

19-20 च्या हंगामासाठी कार्यक्षेत्रात साडेचार लाख मेट्रीक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. या हंगामाची सुरुवात म्हणून अध्यक्ष प्रकाश सोळंके, ज्येष्ठ संचालक धैर्यशील सोळंके व हभप महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन पूजन करण्यात आले.  यावेळी कारखान्याच्या संचालकांसह सभापती अशोक डक, चंद्रकांत शेजुळ, डॉ. वसीम मनसबदार, सुरेश धुमाळ, सुभाष सोळंके, प्रशांत सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बॉयलर पूजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम.डी. घोरपडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here