लंडनस्थित एथेना कॅपिटल्स इथेनॉल प्लांट स्थापन करण्यासाठी हायड्राइज ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये करणार गुंतवणूक

नवी दिल्ली : अलिकडेच लंडन दौऱ्यावर गेलेले उद्योगपती आणि हायड्राइज ग्रुपचे प्रमोटर अनुज कुमार अग्रवाल यांना हायड्राइज ग्रुप ऑफ कंपनीजच्या सिवनी (मध्य प्रदेश) येथे इथेनॉल प्लांट सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. लंडन येथील एथेना कॅपिटल्स इथेनॉल प्लांटसाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा इथेनॉल प्लांट २०२३ मध्ये उत्पादन सुरू करेल अशी अपेक्षा आहे. भारत सरकारच्या मेक इन इंडिया योजनेंतर्गत २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या इथेनॉल प्लांटची क्षमता प्रती दिन ३०० KLPD असेल. यासाठी कच्च्या मालाच्या रुपात ६५० टन तुकडा तांदळाची गरज भासेल.

या कार्यक्रमप्रसंगी अनुज अग्रवाल म्हणाले, याचा शेतकऱ्यांला फायदा होणार आहे. आणि तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कार्यक्रमास प्रोत्साहन मिळेल. भारत सरकारने या वर्षी ८.५ टक्के इथेनॉल मिश्रण उद्दीष्ट गाठण्याचे निश्चित केले आहे. तर पुढील वर्षी हे १० टक्के आणि २०२५ पर्यंत २० टक्के असेल. ते म्हणाले, आम्ही निश्चित रुपात सरकारच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये योगदान देण्यास तयार आहोत. यातून हजारो लोकांना रोजगार संधी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here