रमाला साखर कारखान्याचे दीर्घ कालावधीनंतर पुनरुज्जीवन : योगी आदित्यनाथ

लखनौ : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत चौधरी चरण सिंह यांचे स्वप्न पूर्ण करीत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

बागपत जिल्ह्यातील रमाला साखर कारखाना ही चरण सिंह यांची कर्मभूमी आहे. तिचे सरकारने ३० वर्षानंतर पुनरुज्जीवन केले आहे असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. शेतकरी सन्मान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी योगी म्हणाले, २०१४ पासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने उचललेली पावले महत्त्वपूर्ण आहेत. राज्यात शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी विविध पावले उचलली गेली आहेत.

गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशमध्ये अनेक साखर कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here