कुशीनगर: लाल सड रोगांमुळे २६० कोटींच्या ऊसाचे नुकसान

77

कुशीनगर : पूर्वांचलचे साखरेचे कोठार मानल्या गेलेल्या कुशीनगर येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून ऊसावरील रोगांमुळे हवालदिल झाले आहेत. या भागात लाल सड रोग अधिक प्रभावी आहे. यावेळी या रोगामुळे २६० कोटी नऊ लाख रुपयांचा ७४ हजार क्विंटल ऊस खराब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऊस पिकातून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. ऊस शेतीपासून त्यांचे मन विचलित झाले आहे.

जिल्ह्यात यंदा ८७,८६८ हेक्टरमध्ये ऊस पिकाची लागण करण्यात आली होती. त्यापैकी १०,४३७ हेक्टर पिक लाल सड रोगामुळे नष्ट झाले आहे. ऊस पिकामुळे सर्वाधिक नुकसान ०२३८ या प्रजातीच्या उसाचे होते. त्याशिवाय रुट राटपासून १८६१ हेक्टर तसेच शूट बोरर या रोगामुळे ९७२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

उसाचा या रोगांपासून बचाव करण्यासाठी को ०११८, को ९८०१४, कोसी ०८२७२, कोसी १३२३५, यूपी ५१२५ या प्रजातींचा वापर शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. सध्या खड्डा, रामकोला पी, कप्तानगंज, सेवरही आणि ढाढा हे कारखाने गाळप करीत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी वेद प्रकाश सिंह यांनी सांगितले की, लाल सड रोगापासून बचावासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. दुसऱ्या प्रजातीचे चांगले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here