‘यूपी’मध्ये पहिल्या टप्प्यात कमी साखर उत्पादन; हंगाम लांबला

लखनौ : चीनी मंडी

देशभरात यंदा बंपर साखर उत्पादन होणार असले, तरी देशातील सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये हंगामाच्या पहिल्या टप्प्यात उत्पादन कमी झाले आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर प्रदेशात १.७६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उशिरा हंगाम सुरू झाल्यामुळे गाळप कमी झाले आणि उत्पादन घटल्याचे सांगितले जात आहे.

असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये यंदा हंगाम उशिरा सुरू झाला. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ १.७६ लाख टनच साखर उत्पादन होऊ शकले आहे. गेल्या वर्षी याच काळात ५ लाख ६७ हजार लाख टन साखर उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात ३४९ साखर कारखाने आहेत. त्यातील २३८ साखर कारखानेच १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू झाले होते. मुळात राज्यातील बहुतांश साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातच सुरू झाले आहेत.

दुसरीकडे महाराष्ट्रात गाळप हंगाम वेळेत सुरू झाला आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १०८ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी आतापर्यंत ६ लाख ३१ हजार लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात हंगाम उशिरा सुरू झाला होता. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ३.२६ लाख टन साखर उत्पादन झाले होते. कर्नाटकमध्ये या वर्षी १५ नोव्हेंबरपर्यंत ५९ साखर कारखाने कार्यान्वित झाले असून, त्यातून १.८५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी राज्यात ३.७१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. गुजरातमध्ये याच काळात १४ सारखान्यांमधून १ लाख ५ हजार लाख टन उत्पादन झाले होते. त्याच काळात गेल्यावर्षी केवळ ८० हजार टन साखर तयार झाली होती. तमीळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यात केवळ चार साखर कारखाने सुरू असून, त्यातून ६० हजार टन साखर तयार झाली आहे. गेल्यावर्षी तेथे या काळात केवळ १७ हजार टन साखर उत्पादन झाल होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here