सीमाभागातील कारखान्यांनी दिला उसाचा कमी दर

कोल्हापूर, दि. 19 : गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात जादा दराच्या आमिष दाखवून महाराष्ट्रातील ऊस पळवणार्‍या कर्नाटकातील साखर कारखान्यांनी कायद्यानुसार एफआरपी ची रक्कम अद्याप दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी उसाची कमतरता भासू नये म्हणून कर्नाटकातील सीमा भागात असणाऱ्या साखर कारखान्यांनी महाराष्ट्रापेक्षा जादा दर जाहीर केला होता. दरम्यान इतर साखर कारखान्यात प्रमाणे
आम्हीही 2900 आणि त्यापुढे दर देऊ असे सांगून कर्नाटकातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्रातील ऊस नेला. पहिला महिनाभर 2900 ने पेमेंट केले. नंतर लोकांनी आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी 2500 रुपये देणार म्हणून सांगितले. पण प्रत्येक्षात 2000 रुपये दिले आहे.
त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्रात असणाऱ्या साखर कारखान्यांनी मात्र आतापर्यंत प्रतिटन 2500 ते 2700 रुपये दिले आहे. त्यामुळे या वर्षीच्या हंगामात कर्नाटक मध्ये ऊस घालण्याचे धाडस शेतकरी करतील असे वाटत नाही.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here