एक जूनपासून एलपीजी सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे नवे दर जारी केले आहेत. आज इंडेनचा सिलिंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने व्यावसियाक सिलिंडरच्या दरात ही कपात केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकाला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. १४.२ किलोवाले घरगुती सिलिंडरची किंमत जैसे थे ठेवण्यात आली आहे. हा सिलिंडर आताही १९ मे रोजी जारी केलेल्या दरानेच मिळत आहे.

याबाबत लाइव्ह हिंदुस्थानने दिलेल्या वृत्तानुसार, घरगुती सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना आतापर्यंत दोनदा दरवाढीचा फटका बसला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा ७ मे रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर १९ मे रोजीही घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर दरात वाढ करण्यात आली. सात मे रोजी एलपीजीच्या दरात बदल केल्यानंतर घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागला तर १९ किलोचा कमर्शिअल सिलिंडर १० रुपये स्वस्त झाला होता. १९ मे रोजी याच्या दरात ८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता १९ किलोचा सिलिंडर १ जूनपासून १३५ रुपयंनी स्वस्त मिळेल. दिल्लीत आता या सिलिंडरची किंमत २३५४ रुपयांऐवजी २२१९ रुपये, कोलकातामध्ये २४५४ रुपयांऐवजी २३२२ रुपये, मुंबईत २३०६ रुपयांऐवजी २१७१.५० रुपये आणि चेन्नईत २५०७ रुपयांऐवजी २३७३ रुपये झाली आहे. एक मे रोजी यामध्ये जवळपास १० रुपयंची वाढ झाली होती. तर मार्च महिन्यात १९ किलोचा एलपीजी दिल्लीत २०१२ रुपयांना होता. हा दर १ एप्रिल रोजी २२५३ रुपये आणि एक मे रोजी २३५५ रुपये करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here