आजपासून एलपीजी सिलिंडर महागले, एक जुलैपासून नवे दर लागू

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या दराने सर्वसामान्यांना हैराण केले आहे. आता विना अनुदानित गॅस सलिंडरचा दर वाढविण्यात आला आहे. त्यामुळे एक जुलैपासून इंडेनचा सिलिंडर भरण्यासाठी २५ रुपये जादा मोजावे लागणार आहेत. मे आणि जून महिन्यात सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. एप्रिल महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली होती.

आज दिल्लीमध्ये एलपीजी सिलिंडरचा दर ८३४ रुपये आहे. दिल्लीत जानेवारी महिन्यात सिलिंडरचा दर ६९४ रुपये होता. तो फेब्रुवारी महिन्यात ७१९ रुपये करण्यात आला होता. १५ फेब्रुवारी रोजी यात पुन्हा वाढ करून तो ७६९ रुपये करण्यात आला. त्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा त्यात वाढ करून ७९४ रुपयांवर पोहोचविण्यात आला. मार्च महिन्यात एलपीजी सिलिंडरचा दर ८१९ रुपयांवर गेला.

दरम्यान १९ किलोच्या सिलिंडरचे दरही वाढविण्यात आले आहेत. एक जून रोजी दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरच्या दरात १२२ रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र, या महिन्यात याच्या दरात वाढ करण्यात आली. इंडियन ऑईल कंपनीच्या वेबसाईटनुसार दिल्लीत आता याचा दर १४७३.५ रुपयांवरून १५५० रुपये प्रती सिलिंडर झाला आहे.

एक जुलैपासून लागू झालेल्या दरानुसार दिल्लीत ८३४.५ रुपयांना मिळणारा सिलिंडर कोलकातामध्ये ८६१ रुपयांना आहे. तर मुंबईत तो ८३४.५ रुपयांना मिळतो. चेन्नईत सिलिंडरचा दर ८५० रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here