एलपीजीची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार

आधीच्या महिन्यातील आंतरराष्ट्रीय बाजारमूल्यानुसार एलपीजीची किंमत ठरते. जानेवारी 2020 मध्ये एलपीजीचे आंतरराष्ट्रीय मूल्य डॉलर्स 448/मेट्रिक टनवरुन डॉलर्स 567/मेट्रिक टनवर पोहोचले. त्यामुळे 14.2 किग्रॅ सिलेंडरच्या किमतीत 144.50 रुपये वाढ झाली.

मात्र, 14.2 किग्रॅ सिलेंडरकरिता घरगुती व्यापारकर्त्याने सरकारकडून मिळणारी सबसिडी 153.86 रुपयांवरुन वाढवून 291.48 रुपये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या ग्राहकांसाठीची सबसिडी 174.86 रुपये प्रति सिलेंडरवरुन 312.48 रुपये करण्यात आली आहे.

देशात सध्या 27.76 कोटींहून अधिक जोडण्यांसह राष्ट्रीय एलपीजी व्याप्ती जवळपास 97 टक्के आहे. त्यामुळे सुमारे 27.76 कोटी ग्राहकांपैकी जवळपास 26.12 कोटी ग्राहकांच्या वाट्याची मूल्यवृद्धी सरकारद्वारे सबसिडीच्या माध्यमातून वहन केली जात आहे.

(Source: PIB)

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here