साखर कारखान्याकडून ३६ कोटींची ऊस बिले अदा

रुडकी : लक्सर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात १५ फेब्रुवारीपर्यंत खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी सर्व बिले ऊस समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली आहेत, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय कुमार खंडेलवाल यांनी सांगितले. त्यानंतर कारखान्याने मंगळवारी १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसापोटी २६ कोटी रुपयांची बिले लक्सर शिवाय ज्वालापूर, इक्बालपूर व लिब्बरहेडी ऊस विकास समित्यांकडे पाठविली आहेत.

कारखान्याने ऊस बिले दिल्याच्या माहितीला दुजोरा देताना लक्सर समितीचे प्रभारी सचिव सूरजभान सिंह यांनी सागंतिले की, कारखान्याकडून ऊस बिलांपोटी धनादेश मिळाले आहेत. यापूर्वीचे धनादेश ऊस विकास समितीने खात्यांमध्ये जमा केले आहेत. पैसे समितीकडे जमा होताच, पुढील ४८ तासांत ते शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत. लवकरच उर्वरीत बिलेही दिली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here