मधुकॉन शुगर तर्फे मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी 1.50 करोड चे सॅनिटायजर

108

मधुकॉन शुगर तर्फे मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी 1.50 करोड चे सॅनिटायजर
खम्मम(तेलंगणा) : मधुकॉन शुगर अ‍ॅन्ड पॉवर इंडस्ट्रिज लिमिटेड आणि नामा मुथैया मेमोरियल ट्रस्ट ने तेलंगणा मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी 1.50 करोड रुपयांच्या हॅन्ड सॅनिटायजर लिक्विड ची मदत केली. कंपनी आणि ट्रस्ट च्या प्रतिनिधी नामा सेठिया आणि नामा प्रधुवी तेजा यांच्या बरोबर खम्मम च्या सांसद आणि टीआरएस चे नेता नागेश्‍वर राव यांनी या सहकार्याबाबत आईटी, उद्योग मंत्री के.टी. रामाराव यांना एक पत्रही दिले आहे.

त्यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार मधुकॉन शुगर एन्ड पॉवर इंडस्ट्रिज आणि डीएम अ‍ॅन्ड एचओ च्या माध्यमातून स्वास्थ्य आणि चिकित्सा कर्मचारी, पोलिस, स्वयंसेवक आणि सॅनिटरी कर्मचारी यांना हे सॅनिटायजरचे वितरण केले जाईल. त्यांनी असेही सांगितले की, ट्रस्टच्या माध्यमातून लॉकडाउनच्या घोषणेनंतर लगेचच जिल्ह्यामध्ये गरजूंना भोजन आणि आवश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. मंत्री रामाराव यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरुन मधुकॉन शुगर अ‍ॅन्ड पावर इंडस्ट्रिज लिमिटेड ला कोरोना वायरस च्या विरोधातील लढाईमध्ये मदत करण्यासाठी इथेनॉल आधारीत सॅनिटायजर आणि मास्क दान करण्यासाठी धन्यवाद दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here