भोपाळ : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रस्तावित इथेनॉल धोरणावर चर्चा झाली. चौहान यांनी सांगितले की, इतर राज्यांच्या तुलनात्मक अभ्यासानंतर राज्याचे धोरण तयार केले जाईल असे चौहान म्हणाले. मध्य प्रदेशात मक्का, ऊस आणि इतर धान्यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी युनिट स्थापन करण्याबाबत विचार केला जाईल. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या शक्यतांसाठी प्रोत्साहन योजनांचीही तयारी केली जाणार आहे.
चौहान म्हणाले, सर्व गोष्टींवर साकल्याने विचार करून केंद्र सरकारशी संपर्क साधला जाईल. त्यांच्याकडून आवश्यक ती मदत मिळवली जाईल. केंद्र सरकारमधील संबंधीत मंत्रालये आणि केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, आतापर्यंत किमान १८ गुंतवणूकदारांनी राज्यात ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव सादर केले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link