मध्य प्रदेशची राजधानी भोपाळसह राज्यभरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सोमवारीही सुरूच राहिली. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) भोपाळमध्ये पुढील २४ तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारपर्यंत पाऊस सुरू राहू शकतो. राज्यातील ३९ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे तज्ज्ञ नरेंद्र मिश्रा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, राज्यात आणखी दोन दिवस पावसाची अशीच स्थिती राहिल. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी भोपाळ आणि नर्मदापूर या जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.