भोपाळ (मध्य प्रदेश): काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गुरुवारी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मुरैना जिल्ह्यातील साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले.
पत्रात सिंधिया यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील कैलारस शहरातील बंद साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचे काँग्रेस पक्षाने निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास सांगितले. “विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व सहा जागांवर आम्हाला निवडून देऊन मुरैनाच्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला. कारखाना पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे आपले कर्तव्य आहे,”असेही त्यांनी पत्रात लिहिले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.