शाजापूर : मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील आगर माळवा येथील घुरसिया आणि मानकपूर येथे धान्यावर आधारित इथेनॉल प्लांट उभारण्याची योजना सत्व रिफायनरीने आखली आहे. या प्रस्तावित प्लांटची क्षमता १२० KLPD असेल.
सत्व रिफायनरीला या प्रकल्पासाठी २६.५६ एकर जमीन देण्यात आली आहे आणि त्यातून १२७ लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. १ फेब्रुवारी २०२३ रोजी, रिफायनरीच्या या प्रकल्पाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून (MoEFCC) मंजुरी मिळाली आहे. Q१/FY२४ मध्ये याचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.