उत्तर प्रदेश: ऊस विभागाकडून बनावट शेतकऱ्यांचा शोध सुरू

महराजगंज : आगामी गळीत हंगामामध्ये प्रामाणिक शेतकऱ्यांची लूट होवू नये यासाठी ऊस विभागाने बनावट शेतकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. तोडणी पावतीसाठी अडवणूक होवू नये यासाठी सर्व शेतकऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आढळून येणाऱ्या बनावट, भूमिहिन, डबल बाँड करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर अशा शेतकऱ्यांचा सट्टा लॉक केला जाईल.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगाम २०२२-२३ साठी जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले. यांदरम्यान शेतकऱ्यांनी घोषणापत्रामध्ये आपले आधार कार्ड, बँक पासबूक, जन सुविधा केंद्रातून मिळालेला उतारा, मोबाईल क्रमांक दिला आहे. तोडणी पावतीची समस्या पाहता यावर्षीही असंख्य शेतकऱ्यांनी ऊस समितीचे सदस्य बनून चोरट्या मार्गाने आपली पावती तयार करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ऊस आयुक्तांच्या आदेशानंतर आता अशा शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होतील. नोव्हेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या गळीत हंगामासाठी ऊस विभागाने १५ ते २२ सप्टेंबर या काळातील ऊस मेळावे घेवून सट्टा तपासणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिसवा, घुघली, फरेंदातील बनावट शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा ऊस अधिकारी ओमप्रकाश सिंह यादव यांनी सांगितले की, गळीत हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येवू नयेत यासाठी पडताळणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here