महाराष्ट्र: कोल्हापूर विभागात ३० साखर कारखाने सुरू

103

महाराष्ट्रात गळीत हंगामाने गती घेतली आहे. आतापर्यंत सोलापूर विभागात सर्वाधिक ३४ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला आहे. कोल्हापूर विभागात अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगामाला आधीच सुरुवात केली आहे.

साखर आयुकतालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत कोल्हापूर विभागात आतापर्यंत ३० कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत ३३.२० लाख टन उसाचे गाळप करून ३२.७४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. पुणे विभागात आतापर्यंत २६ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. विभागात आतापर्यंत २६.७३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आह.

राज्यात एकूण १४४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये ७० सहकारी आणि ७४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ११९.४४ लाख टन उसाचे गाळप झाले असून राज्यात आतापर्यंत १०३.७४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.६९ टक्के इतका आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here