अहमदनगर साखर कारखान्यात भिषण आग, आठ जणांची प्रकृती गंभीर

महाराष्ट्रातील अहमदनगरमधी साखर कारखान्यात भिषण आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार आणि प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार अहमदनगरच्या साखर कारखान्यातील डिस्टिलरी युनिटमध्ये स्फोट झाला. त्यानंतर आगीच्या ज्वाळा पसरल्या. कारखाना आणि परिसरात जवळपास ८० लोक अडकले होते. त्यापैकी बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमक दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न तातडीने सुरू केले. जवळपास १० वाजून ४० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या अपघातात जवळपास आठ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

वनइंडिया वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, जखमींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आगीबाबत समोर आलेल्या व्हिडिओंतून स्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून आले आहे. गंगा माई साखर कारखान्यात लागलेल्या या भिषण आगीत खूप नुकसान झाल्याचे इंडिया टुडेने म्हटले आहे. ज्यावेळी बॉयलरमध्ये स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कामगार होते. जवळपास ८० लोक अडकले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. आगीने नेमके किती नुकसान झाले याची माहिती उपलब्ध नाही. कारखान्याकडूनही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here