महाराष्ट्र : राज्यातील साखर उत्पादनात नऊ लाख टनांची घट

कोल्हापूर : राज्‍यात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात घट दिसून आली आहे. २२ डिसेंबरअखेर २९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्‍या वर्षी या कालावधीत ३८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ९ लाख टनांनी साखर उत्पादन कमी झाले आहे. राज्याचा साखर उताराही ९.२ वरून ८.६३ टक्क्यां‍पर्यंत खाली आला आहे. अनेक कारखाने अजूनही पुरेशा क्षमतेने चालत नसल्यानेच साखर उत्‍पादनात पिछाडी असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ पाच कारखाने यंदा बंद आहेत. यंदा १९४ साखर कारखाने गाळप करीत आहेत. गेल्‍यावर्षी ही संख्या १९९ होती. ५ सहकारी साखर कारखाने सुरू होऊ शकले नाहीत. कारखान्यांना गेल्‍यावर्षीच्या तुलनेत ऊस कमी मिळत आहे. आतापर्यंत ३४० लाख ऊस गाळप झाले. गेल्‍या वर्षी ४१७ लाख टन ऊस गाळप झाले होते. दरम्यान, कोल्हापूर विभागाने साखर उत्पादनात २२ डिसेंबरअखेर अग्रस्थानावर झेप घेतली आहे. हा विभाग पुण्याबरोबरीने अग्रस्थानावर आहे. विभागात ३७ साखर कारखान्‍यांनी ६९ लाख टन उसाचे गाळप केले. यातून ६.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.८३ टक्के आहे. तर पुणे विभागातील २९ साखर कारखान्यांनी ७७ लाख टन ऊस गाळप करून ६.८ लाख टन साखरेचे उत्पादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here