Maha-US Nondani app: महाराष्ट्रात ऊस नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ॲपची सुविधा

पुणे : चालू हंगामातही महाराष्ट्रात ऊसाचे बंपर उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे आणि साखर कारखाने एक ऑक्टोबरपासून २०२२-२३ चा हंगाम सुरू करण्यासाठी तयार आहेत. साखर कारखाने ऊसाची नोंदणी करीत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचा विचार करून राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना आपला ऊस नोंदविण्यासाठी मोबाईल ॲप (Maha-US Nondani app) दिले आहे. या ॲपवर एकदा नोंदणी केल्यानंतर कोणत्याही कारणाने कारखाना ऊस गाळपास मनाई करू शकत नाही. महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम नेहमी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत अथवा नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो आणि एप्रिलच्या मध्यावधीपर्यंत सुरू राहतो. पिकाचे उच्चांकी उत्पादन झाल्याने २०२१-२२ या हंगामात मे अखेरपर्यंत गाळप प्रक्रिया सुरू राहीली. महाराष्ट्रात या वर्षीही उच्चांकी ऊस उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

अलिकडेच साखर आयुक्त कार्यालयाने विकसित केलेले ॲप लाँच करताना राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, सरकारने एक ऑक्टोबरपासून ऊस गाळप करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, अधिकृत निर्णय १५ सप्टेंबर रोजी कॅबिनेट कमिटीकडून होईल. मंत्री सावे म्हणाले की, ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांना कारखान्यांकडून नोंदणी विषयक कोणतीही अडचण येणार नाही. कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत तक्रारी आहेत, अथवा शेतकरी चिंतेत आहेत की त्यांचा ऊस गाळपाविना राहू शकतो. मात्र, आता या ॲपमधून अडचणी सुटतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here