महाराष्ट्र : कोरोना वाढीचा वेग घटला, २४ तासात नवे ९,६६६ रुग्ण

नवी दिल्ली/मुंबई : एकीकडे देशात कोरोना संक्रमणाची गती संथ झाली आहे. देशात काही राज्यांत कोरोना रुग्ण वाढत होते, अशा ठिकाणीही आता दिलासा मिळू लागला आहे. कोरोना मृत्यूंच्या संख्येमुळे चिंता कायम आहे. देशाची राजधानी दिल्लीत रविवारी १४१० नवे रुग्ण आढळले. तर महाराष्ट्रात ९.६६६ नवे रुग्ण आढळले. तामीळनाडूत ६१२० रुग्ण आढळले आहेत.

याबाबत ईनवभारत डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येत आहे. रविवारी महाराष्ट्रात ९,६६६ रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या ७८,०३.७०० झाली आहे. तर ६६ जणांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १,४३,०७३ वर पोहोचली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रविवारी ५३६ नवे रुग्ण सापडले. तिघांचा मृत्यू झाला. येथे एकूण १०,५०,४५५ रुग्ण आढळले असून आतापर्यंत १६,६६१ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात २५१७५ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ७५,३८,६११ वर पोहोचली आहे. राज्यात अद्याप १,१८,०७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here