महाराष्ट्र: पिककर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आता ३१ जुलैपर्यंत मुदत

146

मुंबई : शेतकऱ्यांनी सहकारी बँका, ग्रामीण तसेच व्यापारी बँकांकडून घेतलेले पीक कर्ज भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. एप्रील आणि मे महिन्यात कोरोना महामारीमुळे लागू असलेला लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आपली पिके विक्री करण्यात अडचणी आल्या होत्या. अनेक साखर कारखान्यांनीही अद्याप शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कर्ज वसुलीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली.

२०२०-२१ मध्ये सरकारने पिक कर्जाच्या रुपात ६२,४५९ कोटी रुपयांच्या तुलनेत ४७,९७२ कोटी रुपये बँकांकडून वितरीत केले होते. तर वाणिज्य बँकांकडून २६,६७७ कोटी रुपयांचे वितरण झाले. याशिवाय जिल्हा आणि ग्रामीण बँकांकडून अनुक्रमे १७,७५७ कोटी रुपये आणि ३,५३८ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. एकूण ७७ टक्के रक्कम वितरीत करण्यात आली आहे. खरीप पिकांच्या लागवडी पूर्वी शेतकरी बँकांकडून पिक कर्ज घेतात. वेळेवर याची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. पाटील यांनी सांगितले की, डॉ. पंजाबराव देशमुख योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज परतफेड केली आहे, त्यांना शून्य व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here