महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार कोरोनाग्रस्त, रुग्णालयात दाखल

108

महाराष्ट्राचे उपमु़ख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले की, त्यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मुंबईच्या एका हॉस्पीटलमध्ये दाखल झाले आहेत. एका संदेशामध्ये पवार यांनी सांगितले की, त्यांची तब्येत आता बरी आहे.

अजीत पवारांनी सांगितले की, मी कोरोना पॉजिटिव्ह आढळलो आहे. सावधानता म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी ब्रीच कैंडी हॉस्पीटलमध्ये दाखल झालो आहे. त्यानीं हे देखील सांगितले की, पक्षातील कार्यकर्ते आणि नागरीकांनी त्यांच्या तब्येतीबाबत चिंताग्रस्त राहू नये. काही काळाच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा येतील.
गुरुवारी पवार यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आली होती. गेल्या काही महिन्यांनंतर महाराष्ट्रातील एक डझनपेक्षा अधिक मंत्री कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. या बरोबरच राज्यातील अनेक मोठे नेते देखील कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here