सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीवर नियंत्रण, सर्वजण सुरक्षित – पुनावाला

पुणे : महाराष्ट्रातील पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) टर्मिनल गेटवरील इमारतीला गुरुवारी आग लागली. घटनास्थळी तत्काळ पोहोचलेल्या अग्निशमक दलाच्या १० गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आगीचे कारण समजू शकले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, मांजरी येथे सीरमच्या नव्या प्लान्टला आग लागली. ३०० कोटी रुपये खर्चुन नव्याने सुरू केलेल्या या प्लान्टमध्ये कोरोनाचे व्हॅक्सिन कोविशिल्डचे उत्पादन करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी केंद्रीय आरोग्य मंत्रीडॉ. हर्षवर्धन यांनी या प्लान्टचे उद्घाटन केले होते. मात्र, सध्या येथे कोरोना लसीचे उत्पादन सुरू करण्यात आलेले नव्हते.

या घटनेनंतर सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी आगीत काही मजल्यांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणतीही जीवीतहानी अथवा गंभीर नुकसान झाले नसल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. अग्निशमन दलाला येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना केल्या.
घटनास्थळी आलेल्या अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले. घटनास्थळी किती जण अडकले आहेत, याची माहिती मिळालेली नाही. खूप लांब अंतरावरूनही आगीमुळे काळे ढग दिसून येत होते. पाचमजली इमारतीमध्ये लवकरच कोरोना लसीचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here