मुंबई : महाराष्ट्रात बुधवारपासून पावसात घट येण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी किरकोळ पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, कोकणात ठिकठिकाणी पाऊस कोसळेल. तर मराठवाडा, उत्तर-दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात किरकोळ पावसाची शक्यता आहे. शनिवारपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहील अशी शक्यता आहे. हवामान विभागाने मात्र, कोणत्याही प्रकारचा अलर्ट अद्याप जारी केलेला नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातील वायू गुणवत्ता सूचकांक चांगला ते समाधानकारक या श्रेणीमध्ये आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत आज, बुधवारी किमान तापमान २५ तर कमाल तापमान ३२ राहील. वातावरण ढगाळ राहील. पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल २९ आणि किमान २२ डिग्री सेल्सिअस तापमान असेल. हलक्या पावसाची शक्यता येथेही वर्तविण्यात आली आहे. नागपूरमध्ये कमाल ३२ आणि किमान २४ डिग्री तापमान राहील. वातावरण ढगाळ राहील. तरेस विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळू शकतो. नाशिक आणि औरंगाबादमध्येही अशीच स्थिती राहिल असे अनुमान आयएमडीने व्यक्त केले आहे.