महाराष्ट्रात आतापर्यंत ६९३ क्विंटल साखर उत्पादन

महाराष्ट्रातील साखर उत्पादन आता गतीने सुरू आहे. आणि या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा साखर कारखाने सुरू आहेत. हंगाम २०२०-२१ मध्ये १९० कारखान्यांचे सुरू होते. तर आताच्या हंगामात १९४ कारखाने सुरू आहेत.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ या हंगामात २७ जानेवारी २०२२ पर्यंत महाष्ट्रात एकूण १९४ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. यामध्ये ९६ सहकारी तर ९८ खासगी कारखाने कार्यरत आहेत. ६९२.३१ लाख टन उसाचे गाळप सुरू आहे. राज्यात आतापर्यंत ६९३.५६ लाख क्विंटल साखर उत्पादन सुरू आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी साखर उतारा १०.०२ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ४५ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. येथे २७ जानेवारी २०२२ पर्यंत १६४.११ लाख क्विंटल ऊस गाळप झाले असून १४८.२३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

राज्यात सर्वात अधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात एकूण १६५.२१ लाख टन ऊस गाळप करून १८८.५८ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. येथे साखर उतारा ११.४१ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here