महाराष्ट्रात आतापर्यंत ८४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

107

पुणे : महाराष्ट्रात यंदाच्या गाळप हंगामात मोठ्या संख्येने साखर कारखान्यावर सहभाग घेतला. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीपर्यंत १८७ साखर कारखाने गाळप करीत आहेत. राज्यात ८१८.४८ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. एकूण ८३९.८१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.

राज्यात सरासरी साखर उतारा १०.२६ टक्के आहे. सद्यस्थिती कोल्हापूर विभागात ३६ साखर कारखाने सुरू आहेत. आणि एक कारखान्याचे गाळप बंद झाले आहे. सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात आहेत. तेथे २७ फेब्रुवारी पर्यंत ४१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू ठेवले हते. त्यापैकी ८ कारखाने आता बंद झाले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here