महाराष्ट्र: मुंबईत मुसळधार पावसाचा आयएमडीचा इशारा, तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

59
मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) रायगड, रत्नागिरी आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि लगतच्या भागात मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आणखी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांत वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
न्यूज१८ने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात जोरदार पाऊस झाला. मुंबईत हवामान विभागाच्या सांताक्रूझ वेधशाळेने, उपनगरांत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ९३.४ मिमी पावसाची नोंद केल्याचे पीटीआयने म्हटले आहे. गेल्या २४ तासात कुलाबा वेधशाळेने ५९.२ मिमी पावसाची नोंद केली, असे आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत मध्यम आणि शेजारील रायगडमध्ये अती तीव्रतेच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याचेही आयएमडीकडून सांगण्यात आले. बुधवार आणि गुरुवारी हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे, पालघर, पुणे या लगतच्या शहरांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेने रायगड, रत्नागिरी आणि सातारा येथे मंगळवारी ‘ऑरेंज’ अलर्ट असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here