महाराष्ट्र : गाळपासह राज्याच्या साखर उत्पादनात वाढ

कोल्हापूर : यंदा मान्सून कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका सर्वच खरीप पिकांना बसला. उसालाही त्याची झळ पोहोचणार, हे निश्चित होते. साखर कारखान्यांना ऊस टंचाईची धास्ती होती. प्रत्यक्षात यंदा गेल्यावर्षीपेक्षा जास्त गाळप झाले. राज्याचे गाळपही वाढले असून, सरासरी साखरेच्या उत्पादनात १८ लाख टनांची वाढ अपेक्षित आहे. मात्र, ऊस उत्पादन कमी होण्याच्या भीतीने केंद्र सरकारने उसाच्या रसापासून अथवा बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती बंद केली. मळीपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली. मात्र, साखरेचे उत्पादन वाढल्याने आगामी काळात दर घसरण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सरासरी १२० दिवस चालला. कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी १ कोटी ५१ लाख २५ हजार टन, तर सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी ८८ लाख ७५ हजार टन, असे २ कोटी ४० लाख टनांचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी एकूण २ कोटी ४० लाख टन उसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ९ लाख ५१ लाख टनांनी गाळप वाढले आहे. गेल्या चार महिन्यांत सर्वच कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिक गाळप केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ९३ टन उत्पादन होते. त्यात यंदा वाढ होऊन ते ९८ टनांपर्यंत गेल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here