महाराष्ट्र : शंभर टक्के ऊस तोडणी करण्याची किसान मोर्चाची मागणी

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील किसान मोर्चाने ५ मे रोजी साखर आयुक्तालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ५० लाख टन ऊस अद्याप तोडणीविना उभा आहे. मात्र, गाळप हंगाम समाप्त झाला आहे. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी सांगितेल की, आम्ही शेतात असलेल्या अतिरिक्त उसाची तोडणी करण्याची मागणी करत आहोत. मात्र, सरकार आणि साखर कारखाने किमान समर्थन मूल्याबाबत याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जवळपास ५० लाख टन ऊस शेतात आहे.

हिंदूस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, काळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कारखाने तोडणी करत नाहीत. तोडणी झाली नसल्याने उसाचे वजन घटले आहे. प्रचंड उन्हाळ्यामुळे शेतकऱ्यांना पिक टिकवणे मुश्किल झाले आहे. शंभर टक्के ऊस तोडणी करावी अशी आमची मागणी आहे. जर कारखाने यात अपयशी ठरले तर शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ७५,००० रुपये नुकसान भरपाई द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here