महाराष्ट्र: गेल्या हंगामात अनेक साखर कारखाने तोट्यात, निम्मे कारखान्यांकडे भांडवलाची कमतरता

287

मुंबई : आगामी २०२१-२२ या गळीत हंगामापूर्वी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती गतीने कमजोर झाल्याची दिसून येत आहे. या हंगामात कमकुवत बॅलन्स शीटमुळे ९५ कारखान्यांपैकी ५१ कारखाने वित्त संस्थांकडून निधी मिळवण्यात अपयशी ठरतील अशी शक्यता आहे.

इंडियन एक्सप्रेस डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सहकारी कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयात जमा केलेल्या बॅलन्स शीटच्या विश्लेषणात असे आढळले आहे की, ५३ कारखान्यांचे नेट वर्थ सकारात्मक आहे. तर ४२ कारखान्यांचे नेट वर्थ नकारात्मक आहे. नेटवर्थ म्हणजे कारखान्याच्या संपत्तीचे एकूण मूल्य होय. पॉझिटिव्ह नेट वर्थ असेल तर कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दिसते. तर निगेटिव्ह नेट वर्थ असेल तर देणी अधिक असल्याने कमजोर बॅलन्सशीट असल्याचे हे संकेत मानले जातात.

राज्यात केवळ ३० साखर कारखान्यांनी नफा नोंदवला आहे. तर उर्वरीत कारखाने गेल्या गळीत हंगामात तोट्यात आहेत. यामध्ये चिंतेची बाब अशी आहे की, केवळ ३६ कारखान्यांकडे वित्तीय संस्थांकडून निधी जमविण्याची क्षमता आहे. तर उर्वरीत कारखाने असे करू शकणार नाहीत. भरपूर ऊसाचे वर्ष असूनही साखर उद्योगासह राज्य सरकारसाठी हा एक चिंतेचा विषय ठरला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here