महाराष्ट्र: मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आज जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई : एकीकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत गेल्या रविवारपासून पावसाची तिव्रता वाढली आहे. दुसरीकडे सोमवारी दुपारपर्यंत अनेक उपनगरांमध्ये पाऊस कोसळला. आज, मंगळवारी मुंबईसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सोमवारी मुंबईसह काही भागात जोरदार पाऊस कोसळला. बोरीवली फायर ब्रिगेड, कांदिवली, ठाणे जिल्ह्यातील कौस, खरदीपाडा, कल्याण-डोंबिवली विभादात ४० ते ५० मिलिमिटर पाऊस कोसळला. सोमवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला होता.

आज मराठवाडा, परभणी, हिंगोलीत बुधवारपर्यंत एक ते दोन ठिकाणी जोरदार पाऊस कोसळू शकतो. तर नांदेड, लातूर जिल्ह्यात आगामी गुरुवारपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भात शुक्रवारपर्यंत सर्व जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळेल. गुरुवारी भंडारा, चंद्रपूर, गुरुवारी यवतमाळ, गढचिरोली, गोंदीयाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here