महाराष्ट्र: डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वाढले

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दुसरीकडे डेल्टा व्हेरियंटची भीतीही वाढत आहे. राज्यात सोमवारी डेल्टा व्हेरियंटचे १० रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत राज्यात ७६ रुग्ण असून मिरज, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही नवे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान डेल्टा व्हेरियंटमुळे पाच जणांचा मृत्यूही झाला आहे.
राज्यात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण ७६वर पोहोचले असून त्यापैकी दहा जणांनी कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर १२ जणांनी एकच डोस घेतला आहे. या रुग्णांमध्ये ३९ महिला असून नऊ मुलांचा समावेश आहे. त्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे.

डेल्टा व्हेरियंटच्या ३९ रुग्णांचे वय १९ वर्ष ते ४५ वर्षापर्यंत आहे. तर १९ जणांचे वय ४६ ते ६० वर्षे इतके आहे. राज्याचे सर्व्हिलन्स ऑफिसर डॉ. प्रदीप आवटे यांनी यातील ३७ रुग्णांत किरकोळ लक्षणे असल्याचे सांगितले. राज्य सरकारने दहा हजार नमुने तपासणीला पाठवले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आवटे म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here