देशात ऊस उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

मुंबई : ऊस पिक हे हमखास पैसा देणारे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे देशातील काही राज्यांत मोठ्या प्रमाणात शेतकरी ऊस शेती करतात. काही राज्यांमध्ये तर ऊस हेच प्रमुख पिक आहे. देशात सर्वाधिक ऊस उत्पादन उत्तर प्रदेशात घेतले जाते. महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या तुलनेत उत्तर प्रदेशचा वाटा ४४.५० टक्के आहे. हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. २५.४५ टक्के ऊसासह महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे. कर्नाटक ऊस उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात १०.५४ टक्के ऊस उत्पादन घेतले जाते.

जागतिक पातळीवर विचार केला तर पहिल्या क्रमांकावर ब्राजील तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या ब्राझीलमध्ये 2023-24 च्या चालू हंगामात साखरेचे उत्पादन 403 लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे, जो आजपर्यंतचा दुसरा उच्चांक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here