महाराष्ट्र: एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यास नकार

155

पुणे : साखर आयुक्त कार्यालयाने पूर्ण ऊस बिले न देणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यास नकार दिला आहे.

याबाबत Indianexpress.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त कार्यालयाने महाराष्ट्रातील १८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यास नकार दिला आहे. हे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात अपयशी ठरले आहेत. या कारखान्यांकडे एकूण २०५.०९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील दोन सहकारी कारखान्यांकडे ७२.९१ कोटी रुपये थकीत आहेत. सोलापूरमधील ५, नांदेडमधील चार, बीड, सांगली आणि अहमदनगरमधील प्रत्येकी २ आणि जालना जिल्ह्यातील एका कारखान्याचा यामध्ये समावेश आहे. हे कारखाने एफआरपी देण्यात अपयशी ठरल्याने त्यांना गाळप परवाना मिळालेला नाही.

गेल्या दोन हंगामापासून साखर आयुक्तालयाने गाळप परवाना देण्यासाठी एफआरपी शंभर टक्के देणे कारखान्यांना बंधनकारक केले आहे. परवान्याशिवाय गाळप करणाऱ्या कारखान्यांना प्रती टन ५०० रुपये दंड आकारणी केली जाते. हा दंड लक्षात घेऊन कारखाने परवान्याशिवाय सुरू करण्यास धजावत नाहीत. साखर आयुक्त कार्यालयाकडून योग्य तपासणीनंतरच परवाने दिले जात आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here