महाराष्ट्र : साखर कारखान्यांसाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटची योजना

मुंबई : महाराष्ट्रातील साखर कारखाने साखरेचे अधिक उत्पादन, कमी मागणी आणि शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देण्याबाबत आर्थिक संकटाशी झुंजत आहेत. कारखाने उत्पन्नासाठी इतर पर्याय शोधत आहेत. त्यासाठी अनेक साखर कारखान्यांनी आता कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) सयंत्र स्थापन करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) अलीकडेच आयोजित एका बैठकीत साखर कारखानदारांना सीबीजी प्लांटबाबत चर्चा केली. याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखानदारांना सीजीबीमधील संधींबाबत माहिती दिली. राज्यातील साखर कारखाने दरवर्षी १.५ लाख टन सीबीजी उत्पादन करू शकतात. त्यातून कारखान्यांना अतिरिक्त ७०० कोटी रुपयांची कमाई होईल. याशिवाय ऊर्जा क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने आपल्याला पावले उचलता येतील.

पवार यांनी सांगितले की, साखर कारखान्यांना आपल्या महसूल वाढीसाठी विविध स्त्रोतांचा शोध घेण्याची गरज आहे. फक्त साखर उत्पादनातून नुकसानीची भरपाई होणार नाही. ५००० कॉम्प्रेस्ड बायोगॅस युनिट सुरू करण्यासाठी २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक अपेक्षित आहे. व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले की, राज्यातील भीमा साखर कारखाना प्रायोगिक तत्त्वावर सीबीजी प्लांट स्थापन करणार आहे. आता इतर कारखाने या योजनेशी जोडले जातील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here