महाराष्ट्र: नागपूरमध्ये आजपासून सात दिवस लॉकडाउन

79

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नागपूरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून एक आठवड्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. ज्या भागांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव गतीने झाला, अशा शहरी विभागात हे लॉकडाउन केले आहे. लॉकडाउन लागू झाल्यानंतर रस्त्यांवर अक्षरशः शांतता आहे. एखादे वाहन ये-जा करताना दिसते. मात्र, लॉकडाउनच्या आधी दोन दिवस, शनिवारी भाजी मंडईत प्रचंड गर्दी झाली. लॉकडाउनमधून फक्त अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच काही निर्बंध लागू केले आहेत. राजकीय, धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये गर्दी जमविण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू केला असून काही ठिकाणी शनिवार, रविवारी लॉकडाउन आहे.

महाराष्ट्रात रविवारी कोरोना व्हायरस संक्रमणाचे नवे १६६२० रुग्ण आढळले आहेत. ही या वर्षातील सर्वोच्च संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २३,१४,४१३ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली. विभागाकडील आकडेवारीनुसार, कोवीड १९च्या ५० रुग्णांच्या मृत्यूंनंतर ही संख्या ५२,८६१ झाली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत दररोज १५००० हून अधिक रुग्ण आढळत आहेत.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात ८८६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत २१,३४,०७२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२.२१ टक्के असून मृत्यूदर २.२८ टक्के आहे. महाराष्ट्रात सध्या १,२६,२३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी १,०८,३८१ जणांच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. मुंबईत १९६३ रुग्ण, पुण्यात १७८०, औरंगाबादमध्ये ७५२, नांदेडमध्ये ३५१, पिंपरी-चिंचवडमध्ये ८०६, अमरावतीत २०९ तर नागपूरमध्ये १९७९ रुग्ण आढळले आहेत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here