ऊस तोडीसाठी हार्वेस्टरचा पर्याय

130

सोलापूर : महाराष्ट्रात सोलापूरची ओळख सर्वाधिक साखर कारखाने म्हणून आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यात 38 खासगी आणि सहकारी साखर कारखाने आहेत. त्यापैकी 30 ते 32 कारखाने गाळप हंगामात सहभागी होवू शकतात. पण यंदाच्या गाळप हंगामात ऊस मजूरांची मोठी समस्या शेतकरी आणि कारखानदारांसमोर उभी आहे. आपापल्या गावी परतलेले मजूर ऊस तोडणीसाठी येतील की नाही ही शंकाच आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामासाठी कारखानादारांनी ऊस तोडीसाठी हार्वेस्टरचा पर्याय निवडला आहे.

जिल्ह्यात सरासरी एक लाख 37 हजार हेक्टर ऊस क्षेत्र आहे. नोव्हेंबरमध्ये कारखान्याच्या गाळप हंगामाचा श्रीगणेशा होतो. गाळपाच्या पूर्वीचे तीन महिने महत्वाचे असतात. त्यानुसार कारखान्यातील दुरुस्तीचे काम सुरु होते. वाहतुक यंत्रणेशी करार केले जातात.

कंचेश्‍वर शुगरचे अध्यक्ष धनंजय भोसले म्हणाले, कारखान्यांचा करार कारखानदार वाहनधारक आणि मुकादम यांच्याशी करतात. हा करार ऊसतोड मजुरांसाठी असतो. पण किती मजूर मिळतील याबाबत सांगणे कठीण आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे माजी अध्यक्ष केशवराव आंधळे म्हणाले, महाराष्ट्रातील 15 ते 20 लाख ऊस तोड कामगारांपैकी पाच लाख कामगार बीड मधील आहेत. यंदाच्या हंगामात 30 ते 35 टक्केच कामगार ऊसतोडीसाठी जाण्याचा अंदाज आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here