महाराष्ट्र: आगामी २०२१-२२ हंगामासाठी ऊस आणि साखर उत्पादनाचे पूर्वानुमान जारी

पुणे : महाराष्ट्रातील उसाचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. आता आगामी २०२१-२२ या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त कार्यालयाने आगामी गळीत हंगामासाठी आपला अहवाल तयार केला आहे.
आयुक्तालयाने हंगाम २०२१-२२ यासाठी ऊसाचे उत्पादन ११९४ मेट्रिक टन, साखरेचे उत्पादन १२२ मेट्रिक टन (इथेनॉल प्रक्रियाकृत साखरेसह) होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आगामी गळीत हंगामात १९२ साखर कारखाने सुरू राहतील.
महाराष्ट्रातील सध्याच्या गळीत हंगामात १९० साखर कारखाने सुरू होते. त्यापैकी ९२ कारखाने सहकारी आणि ९५ कारखाने खासगी होते. गेल्या हंगामात उत्पादित झालेल्या ५४५ लाख टन ऊस गाळपाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात एकूण १०१२ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले.

राज्यातील साखर कारखान्यांनी १०६.२८ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे अधिक आहे. तर गेल्या हंगामात कमी ऊस उपलब्धतेमुळे फक्त १४७ साखर कारखाने सुरू होते. तर साखर उत्पादन ६१.६१ लाख टन झाले होते.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here