महाराष्ट्र : ऊस गळीत हंगाम जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आटोपणार

पुणे : महाराष्ट्रात २०२१-२२ या ऊस गळीत हंगामाने अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. यामध्ये केवळ १० लाख टन ऊसाचे गाळप होणे शिल्लक आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शंभर टक्के ऊस गाळपासह जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम समाप्त होईल. यंदाच्या गाळप सत्रात ऐतिहासिक प्रती हेक्टर उत्पादनामुळे महाराष्ट्रात ऊसाची प्रचंड उपलब्धता दिसून आली आहे. नेहमीच्या ९० टन प्रती हेक्टरच्या तुलनेत दु्ष्काळग्रस्त मराठवाड्यात प्रती हेक्टर १२० टनापेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. आधीच्या सर्व अंदाजांना मागे टाकत राज्यातील कारखान्यांनी १३१२ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. २०० पैकी १४६ कारखान्यांनी आतापर्यंत गाळप हंगाम समाप्त केला आहे. मराठवाडा, अहमदनगर आणि पुण्यातील काही भागात कारखान्यांचे गाळप सुरू आहे.

मान्सून नेहमीपेक्षा अधिक गतीने, लवकर येण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने ऊस हार्वेस्टर सेवेवर भर दिला आहे. साखर कारखान्यांच्या मालकांना उष्णतेने नुकसान होण्याच्या शक्यतेने रिकव्हरीतील नुकसान टाळण्यासाठी प्रती टन २०० रुपये ऊस अनुदानाचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने १ मे नंतर गाळप करणाऱ्या सर्व उसासाठी कारखान्यांना अनुदान दिले जाईल असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here