ओमिक्रॉनमुळे महाराष्ट्र सतर्क, परदेशातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाइन राहण्याची सक्ती

मुंबई : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे महाराष्ट्र सरकारने कडक पवित्रा घेतला आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या धोकादायक देशातून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वालिटी राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोनाबाबत महाराष्ट्राने लागू केलेल्या नव्या गाइड लाइन्स नुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांना विमानतळावर आपल्या पंधरा दिवसांच्या प्रवासाची ट्रॅव्हल हिस्ट्री देणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या धोकादायक यादीतील येणाऱ्या देशांतील नागरिकांसाठी विमानतळावर स्वतंत्र काउंटर असेल. सर्व प्रवाशांना ७ दिवसांसाठी संस्थात्मक पातळीवर विलगीकरण बंधनकारक आहे. सातव्या दिवशी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. जर पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले तर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात येईल. जर रिपोर्ट निगेटिव्ह असेल तर त्यांना घरी सात दिवस होम क्वारंटाइन राहण्याची सक्ती केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here