मुंबई : महाराष्ट्रात शुक्रवारी मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी हवामान स्वच्छ राहील. त्यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आणि उकाड्यातही वाढ होईल. नागपूर आणि नाशिकमध्ये हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) विदर्भात १३ ते १५ मे या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यानंतर हवामानात बदल होईल. आणि ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्यात घट होईल. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता समाधानकारक श्रेणीत नोंदविण्यात आली आहे.
एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३५ तर किमान २६ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान साफ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक मध्यम श्रेणीत नोंदला आहे. पुण्यात कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २६ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. नागपूरमध्ये तापमान ४३ आणि ३२ असे राहिल. तर येथे काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. नाशिकमध्ये कमाल तापमान ३८ तर किमान तापमान २३ डिग्री सेल्सिअस राहील. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ४१ तर किमान तापमान २७ डिग्री सेल्सिअस राहील.