मुंबई : महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत उकाड्यापासून दिलासा मिळेल. राज्यातील विविध शहरांत ढगाळ हवाान कायम राहील. तसेच गुरुवारी दिवसभरात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, बहुसंख्य ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान राहील. काही ठिकाणी पाऊसही पडू शकतो. आणखी काही दिवस अशीच स्थिती असेल. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता बहुतांश शहरांत चांगली ते मध्यम या श्रेणीत नोंदविण्यात आली आहे.
एबीपी लाइव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, मुंबईत गुरुवारी कमाल ३४ तर किमान २९ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हवामान ढगाळ राहील. वायू गुणवत्ता सूचकांक चांगल्या श्रेणीत नोंदला आहे. पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान ३४ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असेल. आठवडाभर वातावरण ढगाळ राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नागपूरमध्ये तापमान ४४ आणि ३० असे राहिल. पावसाची शक्यता आहे. येथे आठवडाभर काहीसे ढगाळ वातावरण राहू शकेल. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २४ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे. औरंगाबाद येथे ढगाळ वातावरण राहील. येथे कमाल तापमान ४० तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत नोंदवली आहे. काहीसे ढगाळ वातावरण राहील. पावसाचीही शक्यता आहे.