पुणे : माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी सांगितले की, देशात ऊस उत्पादनात अव्वल स्थान मिळवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक मेहनत घ्यावी लागेल. महाराष्ट्र आता दुसऱ्या स्थानावर आहे. उच्च गुणवत्तेची ऊस शेती करताना विशेष लक्ष दिले पाहिजे, अशा सूचना शरद पवार यांनी केल्या. मांजरी (पुणे) मध्ये वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट (VSI) च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.
मुख्ययमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेती विषयक अडचणी सोडवण्यासाठी सरकारच्या वतीने एका समितीचे गठन करण्यात येणार आहे. या मध्ये शेतकरी धोरणाच्या माध्यमातून दुष्काळ आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणे, ही सरकारची प्राथमिकता राहील. त्यांनी सांगितले की, गरजवंतांना कर्ज माफी बरोबरच, ज्यांनी नियमितपणे कर्ज चुकवले आहे, त्यांना राज्याकडून विशेष प्रोत्साहन मिळेल.
यावेळी ज्या शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनात चांगली कामगिरी केली आहे आणि सहकार क्षेत्रातील ज्या साखर कारखान्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे, त्यांना सन्मानित करण्यात आले. ठाकरे म्हणाले, सरकार मराठवाड्यामध्ये VSI ची शाखा घेऊन येणार. या क्षेत्रात
संशोधनाला गती मिळायला हवी. ते म्हणाले, सहकारी रचना ही साखर उद्योगाची ताकद आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहे.
राज्याचे सहकार मंत्री जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील साखर क्षेत्राचे अतिवृष्टी आणि पुरामुळे खूप नुुकसान झाले आहे. यामुळे साखर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या वर्षी ऊस उत्पादन घटले आहे आणि यामुळे उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे उत्पादनात घसरण होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.