महाराष्ट्र विकसित करत आहे ऊसाची नवी जात; वाढणार साखरेचे उत्पादन

1752

पुणे : साखर उत्पादनात आपले प्रभुत्व कायम राहण्यासाठी महाराष्ट्र ऊसाच्या नव्या जाती विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) मध्ये ऊसाची नवी व्हरायटी Co-18121 विकसित केली जात आहे. इन्स्टिट्यूट च्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या म्हणण्या नुसार या व्हरायटीमध्ये रिकवरी रेट 12.30 टक्क्या पासून 13.10 टक्के पर्यंत आणि उत्पादन प्रति हेक्टर 155 टन होवू शकते, जी गेल्या व्हरायटीपेक्षा जवळपास 25 टन अधिक होईल.
VSI नेतृत्व पूर्व केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार करत आहेत. पवार यांनी ऊसाच्या नव्या प्रजातीला विकसित करण्यावर भर देत आहेत, जेणेकरुन महाराष्ट्र ऊसाच्या क्षेत्रात एकाधिकाराचे वर्चस्व कायम ठेवू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राला मागे टाकून उत्तर प्रदेश ऊस उत्पादनामध्ये बराच पुढे गेला आहे. तेथील व्हरायटी Co-0239 ला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संस्थेचे मार्गदर्शक व ऊस प्रजजन संस्थेचे संचालक श्री. बक्षी राम यांनी विकसित केले होते. संस्थेतील तील वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील साखर कारखाने नव्या ऊस जातीची मागणी करत आहेत, जी केवळ चांगल्या उत्पादन स्तरावरच नाही तर चांगल्या साखर रिकवरी स्तरावरही प्रगती करेल.

संस्थेकडून विकसित आणखी एक ऊस जात VSI 08005 ला 2018 मध्ये राज्यात सादर करण्यात आले. आपल्या दुष्काळ प्रतिरोधी गुणांसाठी ही जात ओळखली जाते त्यामुळे मराठवाड्यातील ऊस शेतकर्‍यांमध्ये ही जात लोकप्रिय आहे.

Co-18121 हि जात Co-86032 आणि Cot- 8021 चे संयोजन आहे. ऊसाच्या व्हरायटीला भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि VSI वर्ष 1987 पासून संयुक्त रुपात विकसित करत आले आहेत. Co-18121 ऊस व्हरायटी वर गेल्या 5 वर्षांपासून संशोधन चालू आहे. डॉ . हापसे यांनी सांगितले की, ही नवी जात उत्पादकता आणि रिकवरीच्या बाबतीत Co-86032 पासून बरीच पुढे आहे. सध्या याचे वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये परीक्षण केले जात आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here