महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा ९ टक्क्यांवर

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये गतीने गाळप सुरू आहे. राज्यातील साखर कारखाने हंगामात चांगली कामगिरी करत आहेत.

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत महाराष्ट्रात एकूण १५७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ७५ सहकारी आणि ८२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १९५.८६ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १७६.५८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९ टक्क्यांवर आहे. साखर कारखान्यांनी ९.०२ टक्के उतारा नोंदवला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत सोलापूर विभागात सर्वाधिक ३७ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार २७ नोव्हेंबरअखेर विभागात ४६.५१ लाख टन ऊस गाळप करून ३८.०६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथे साखर उतारा ८.१८ टक्के आहे.

कोल्हापूर विभागात साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. आतापर्यंत ५१.५५ लाख टन ऊसाचे गाळप करून ५२.८० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.२४ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here