महाराष्ट्रातील साखर उत्पादन १०३ लाख टनांवर

110

पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत, १३ एप्रिल २०२१ अखेर ११८ साखर कारखाने बंद झाले आहेत.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, १३ एप्रिल २०२१ अखेर १९० कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९८९.९१ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०३७.०८ लाख क्विंटल (१०३.७०) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर विभागातील ४३ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३५ कारखाने बंद झाले. नांदेड विभागीतल १५ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. पुणे विभागात १२ कारखाने बंद झाले असून अहमदनगर विभागातील ७ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. तर औरंगाबादमध्ये ४ आणि अमरावती विभागात २ कारखाने बंद झाले आहेत. नागपूरमध्ये १ कारखाना बंद झाला आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here