बाजपूर : शेतकऱ्यांनी ऊसाची लावण तीन ते चार फूट अंतरावर करावी, असे आवाहन काशीपूर येथील ऊस उत्पादक संस्थेचे सहसंचालक नीलेश कुमार यांनी केले. ऊस उत्पादक संस्था तथा प्रशिक्षण केंद्र काशीपूरच्यावतीने ऊस विकास परिषद बाजपूरच्या हरसान गावात प्रगतशील शेतकरी पुष्कर सिंह यांच्या उपस्थितीत गावस्तरीय शेतकरी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ऊस संशोधन केंद्र काशीपूरचे वरिष्ठ संशोधक डॉ. प्रमोद कुमार यांनी प्रगतशील ऊस प्रजाती, ऊस लावणीच्या वैज्ञानिक पद्धती, पोषक तत्वांचे व्यवस्थापन, ऊसाची उत्पादकता वाढवण्याचे उपाय यांची माहिती दिली. डॉ. सिद्धार्थ कश्यप यांनी पिकातील विविध किडींची ओळख, त्यांना रोखण्याबाबत मार्गदर्शन केले.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या शिबिरात शेतकऱ्यांना उसावरील टॉप बोरर, कुरमुला आदी किड रोगांना कसे रोखावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लाल सड रोग, पोक्का बोईंग आदी रोग वेळीच कसे ओळखावेत, त्यावर काय उपाय करता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे संयोजन ऊस उत्पादक संस्था तथा प्रशिक्षण केंद्र काशीपूरचे प्रशिक्षक राजेश कुमार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी ईश्वर सिंह, जगदीश सिंह डोगरा, केशवदत्त, हिम्मत सिंह, दलवीर सिंह, नंदन सिंह, पूरन सिंह, रणजीत सिंह, दिनेश कोरंगा, बाबू सिंह कोरंगा, मुरलीधर उपाध्याय, अशोक शर्मा, ऊस पर्यवेक्षक विनीत, कल्याण सिंह, शेर सिंह, राजेश कुमार गुप्ता, सुनील सैनी, दिनेश चंद्र पांडे, जयपाल सिंह आदी उपस्थित होते.